संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

रशियात लढाऊ विमान कोसळून इमारतीला आग! ४ ठार, ६ बेपत्ता

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मॉस्को- दक्षिण रशियाच्या येयस्क शहरात सोमवारी रात्री लढाऊ विमान रहिवासी इमारतीवर कोसळून दुर्घटना घडली. त्यानंतर इमारतींना भीषण आग लागली. त्यात ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. इतर ६ जण बेपत्ता आहेत. या दुर्घटनेत वैमानिकाला सुरक्षितपणे वाचवण्यात यश आले. यातील जखमींची माहिती मिळालेली नाही.

रशियन लष्कराच्या हवाई दलात सुखोई एसयु-३४ हे सुपरसॉनिक लढाऊ बॉम्बर विमान आहे. मध्यम पल्ल्याचा भेदक मारा करण्याची क्षमता असलेले हे लढाऊ विमान सोमवारी रात्री रशियाच्या येयस्क शहरात रहिवासी भागात कोसळले. त्यामुळे तेथील इमारतींना भीषण आग लागली. तेथे आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट उसळले. त्यात ४ नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला. इतर ६ जण बेपत्ता आहेत. विमानाच्या वैमानिकाला वाचवण्यात यश आले. या लढाऊ विमानाने प्रशिक्षणासाठी हवाई तळावरून उड्डाण केले होते. त्यानंतर त्याच्या इंजिनाला आग लागली आणि ते येयस्क शहरातील ९ मजली इमारतीवर कोसळले. त्यामुळे या इमारतीलाही आग लागली. या अपघाताची झळ परिसरातील १७ इमारतींना बसली. त्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या विमान दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघातग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे रशियन सरकारने जाहीर केले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami