संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

रशियाने युक्रेनमध्ये सोडले अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेले किलर कमांडो

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – रशियन सैन्य युक्रेनवर तीन बाजूंनी हल्ले करत आहेत. लष्करी तळ, हवाई तळ आणि महत्त्वाच्या इमारती एकापाठोपाठ एक रशियन ताब्यात घेत आहेत. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे सैन्य युक्रेनची राजधानी कीवपासून काही किलोमीटर अंतरावर आहे. रशियन सैन्यासह प्राणघातक स्पेट्सनाझ कमांडो देखील युक्रेनच्या सीमेत घुसल्याचे वृत्त आहे.

अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेले हे विशेष कमांडो अत्यंत धोकादायक मानले जातात. त्यांचा स्वतःचा रक्तरंजित इतिहास आहे. या कमांडोंच्या नेतृत्वाखाली रशियन सैन्य आपल्या कारवाया करत असल्याचं या बातमीत म्हटलं जात आहे. स्पेट्सनाझ कमांडो केवळ रशियन मिलिटरी इंटेलिजन्स युनिटसाठी काम करतात. १९९१ पूर्वी रशियाची लष्करी एजन्सी केजीबी असायची, जी खूप कुप्रसिद्ध होती. पण सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर केजीबीची जागा जीआरयूने घेतली. सैन्यासाठी गुप्तचर माहिती गोळा करण्याव्यतिरिक्त, त्याचे स्वतःचे वेगळे कमांडो युनिट आहे, ज्याला स्पिटस्नाझ म्हणतात. त्याचे मुख्य कार्य म्हणजे शत्रूच्या प्रदेशांचा शोध घेणे आणि त्यांचा नाश करणे. स्पेट्सनाझ युनिटची स्थापना १९४९ मध्ये झाली होती.

सोव्हिएत युनियनच्या काळात स्पेट्सनाझ युनिट खूप सक्रिय होते. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर, स्पेट्सनाझ युनिटचा वापर सुरक्षा आणि दहशतवादविरोधी क्रियाकलापांसाठी केला गेला. हे युनिट फक्त मोठ्या रशियन ऑपरेशन्समध्ये वापरले जाते. सीरियावरील हल्ल्यादरम्यान या युनिटची महत्त्वाची भूमिका होती. दोन दशकांपूर्वी, दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी त्याच्या कमांडोंनी कहर केला होता. या युनिटने १९७९ मध्ये अफगाणिस्तानमध्ये हल्ला केला होता. त्यात वेगा हे युनिट आहे, जे अण्वस्त्र घटनांना तोंड देण्यासाठी खास प्रशिक्षित आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami