सीयोल – संपूर्ण जगाचे लक्ष रशिया-युक्रेन युद्धाकडे लागले असताना तसेच अमिरिकेसह मित्र देश व्यस्त असताना या दरम्यान, महिनाभराच्या विरामानंतर उत्तर कोरियाने रविवारी समुद्रात बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले असल्यचेही माहिती कोरियाच्या शेजारील देशांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, उत्तर कोरियाची या वर्षातील आठवी आणि ३० जानेवारीनंतरची पहिली शस्त्रास्त्र चाचणी आहे. काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की उत्तर कोरिया आपले शस्त्र तंत्रज्ञान सुधारण्याचा प्रयत्न करीत आहे आणि दीर्घकाळ रखडलेल्या चर्चेच्या दरम्यान निर्बंधातून सूट देण्यासाठी अमेरिकेवर दबाव आणत आहे. वॉशिंग्टनवर दबाव वाढवण्यासाठी उत्तर कोरियाने अमेरिका रशिया-युक्रेन सहभागी होत असल्याच्या संधीचा फायदा घेत, ही चाचणी केली असल्याचे तसेच त्या चाचण्या वाढवू शकत असल्याचे काही तज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, जपानचे संरक्षण मंत्री नोबुओ किशी यांनी सांगितले की, उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र पूर्व किनारपट्टी आणि जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या बाहेर पडण्यापूर्वी त्याने सुमारे ६०० किलोमीटर उंचीवर सुमारे ३०० किलोमीटरपर्यंत उड्डाण केले होते. चाचणीमुळे जहाजे किंवा विमानांचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे. दक्षिण कोरियाच्या अधिकार्यांनी उत्तर कोरियाच्या राजधानीच्या भागातून क्षेपणास्त्र चाचणी झाल्याची पुष्टी केली आहे. तसेच यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.