नाशिक – रशिया आणि युक्रेन या देशात युद्ध भडकताच एकीकडे शेअर बाजार गडगडला तर दुसरीकडे सोने सर्वोच्च दरावर गेले. नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर तीन टक्के जीएसटीसह 10 ग्रॅमच्या मागे 53 हजारांवार गेला. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 50980 वर गेला. ही गेल्या वर्षातली सर्वोच्च भाववाढ आहे.
येणाऱ्या काळात सोन्याचे दर वाढू शकतात. कारण एकीकडे महागाई वाढत आहे. शेअर बाजाराची विश्वासार्हता नाही. हे पाहता गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत. नवी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 51,110 रुपये नोंदवले गेले. 22 कॅरेट सोन्याचे दर 46,850 रुपये नोंदवले गेले. मुंबई येथे 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 51,110 नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46, 850 रुपये नोंदवले गेले. पुण्यात 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 51200 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46900 रुपये नोंदवले गेले. नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 51200 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46900 रुपये नोंदवले गेले. विशेष म्हणजे या दरावर तीन टक्के जीएसटी अतिरिक्त असेल.