संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 02 February 2023

रांजणगावच्या फियाट कंपनीतील सांडपाण्यात बुडून २ कामगारांचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे-शिरुर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसीतील फियाट कंपनीतील सांडपाणी व मैलापाणी वाहून नेणाऱ्या चेंबरमध्ये १५ फूट खोल पडल्याने दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. मात्र,त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यास दुपार उजाडली.
दोन जेसीबीच्या साहाय्याने हा चेंबर फोडून या कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.मच्छिंद्र दादाभाऊ काळे (४२ ) आणि शिंदोडी व सुभाष सुखदेव उघडे (३०) रा. शिरूर अशी मृत कामगारांची नावे आहेत. मच्छिंद्र हा शिरुर तालुक्यातील शिंदोडी तर सुभाष हा शिरुरचा रहिवाशी आहे.रांजणगाव एमआयडीसीतील फियाट कंपनीतील हाऊस किपिंगचे कंत्राट दिलेल्या कंपनीमार्फत हे कामगार कार्यरत होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीतील सांडपाणी व मैलापाणी वाहून नेणारे चेंबर तुंबले. ते काढण्यासाठी सक्शन मशिन असलेले वाहन कंपनीत आले होते. या सक्शन मशिनचा पाइप चेंबरमधे सोडून तेथील मैलापाणी व सांडपाणी खेचण्याचा प्रयत्न चालू होता.सुभाष उघडे यांनी पाइप धरला होता. परंतु, पाइपचे जास्त व्हायब्रेशन होऊ लागल्याने चेंबरमध्ये डोकावून पाहात असतानाच तोल जाऊन ते चेंबरमध्ये पडले. हे पाहून मच्छिंद्र काळे हे त्यांना वाचविण्यासाठी शिडी लावून चेंबरमध्ये उतरले. परंतु, त्यांना वाचवत असतानाच त्यांच्याही डोक्याला मार लागल्याने ते देखील मैलापाणी असलेल्या चेंबरमध्ये अडकले.अनेक कामगारांसमोर हा प्रकार घडला. परंतु, चेंबरचे तोंड छोटे असल्याने आत पडलेल्या कामगारांना मदतीसाठी त्यांना काही करता आले नाही. हे काम करणारा कंत्राटदार बाबूराव गंगाधर कलंदर याने मदतीसाठी फियाट कंपनीचे प्रतिनिधी पंकज सिंग यांना संपर्क साधल्यावर तातडीने दोन जेसीबीच्या साहाय्याने हा चेंबर खोदून काळे व उघडे यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami