मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याबाबत आज पुन्हा एकदा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी एक सनसनाटी ट्विट केले. प्रा. डॉ. मेधा किरीट सोमैया बदनामीप्रकरणी राऊतांना मंगळवारी मुंबईतील शिवडी न्यायालयात हजर राहण्यासाठी वॉरंट जारी करण्यात आले असल्याचे सोमय्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.
सोमय्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, जे पुन्हा राज्याच्या राजकारणात खळबळ माजवू शकतो. राऊतांना न्यायालयाने आज हजर राहण्यासाठी बोलावले होते, मात्र ते न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यामुळे शिवडी न्यायालयात हजर राहण्यासाठी वॉरंट बजावण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १८ जुलै रोजी होणार असल्याचे सोमय्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले. दरम्यान, संजय राऊत यांच्यामागे आधीच ईडीच्या चौकशीचा फेरा लागलेला असताना आता न्यायालय कचेरीच्या वार्याही सुरू होणार का? असा सवाल या ट्विटने उपस्थित झाला आहे.