राकेश झुनझुनवाला यांना आपण शेअर मार्केटमधील मास्टरमाईंड समजतो. मात्र त्यांच्याकडील काही शेअर्समुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेल्या टायटन आणि स्टार हेल्थ इन्शुरन्सला शुक्रवारी 426 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. त्यांच्या या अचानक झालेल्या नुकसानीमुळे त्यांच्या संपत्तीतही घट झाली आहे.
अमेरिकेतील महागाईमुळे आशियाईशेअर बाजार अस्थिर झाला आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत आहे. अमेरिकेत चलनवाढीचा दर ४० वर्षांच्या उच्चांकावर पोचला आहे. त्यामुळे जागतिक बाजारात विक्रीचा जोर जास्त आहे. म्हणूनच देशांतर्गत शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
शेअर बाजारातील घसरणीमुळे टायटनचा शेअर एका दिवसात ५३.२० रुपयांनी घसरला. तर स्टार हेल्थ इन्शुरन्सचा शेअर १८.५५ रुपयांनी घसरला आहे. या घसरणीमुळे राकेश झुनझुनवाला यांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. दरम्यान, टायटनचे शेअर्स 53.20 रुपयांनी घसरल्याने राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीच्या संपत्तीत 240 कोटी रुपयांची घसरण झाली. तर स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या घसरणीमुळे 186 कोटी रुपयांचे नुकसान झाले. दोघांना मिळून 426 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.