संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

राजपथ परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ सर्वाधिक लोकप्रिय पुरस्काराने सन्मानित

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील परेडमध्ये सहभागी झालेल्या चित्ररथांपैकी महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ हा पुरस्कार मिळाला आहे. उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला यंदाचा सर्वोत्तम चित्ररथ म्हणून गौरवण्यात आले आहे. तर सीआयएफच्या चित्ररथाला सर्वोत्तम सेंट्रल आर्म पोलीस फोर्समधील चित्ररथ म्हणून सन्मानित करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

यंदा परेडमध्ये १२ राज्यांचे आणि ९ मंत्रालयांचे असे २१ चित्ररथ सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे भारतीय नौदलाच्या चित्ररथाला सर्व सेवा दलांमधील सर्वोत्तम चित्ररथाचा मान मिळालाय. तर याच गटामधील सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ म्हणून हवाई दलाच्या चित्ररथाला गौरवण्यात आले आहे. मंत्रालयांच्या चित्ररथांपैकी शिक्षण मंत्रालय आणि नागरी उड्डयन मंत्रालयाच्या चित्ररथांना पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. यंदाच्या उत्तर प्रदेशच्या चित्ररथामध्ये वाराणसी काशी विश्वनाथ धामचा देखावा साकारण्यात आलेला. तर यंदा महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथात साताऱ्यातील ‘कास’ पठार दाखवण्यात आलं होतं. महाराष्ट्राच्या चित्ररथात साताऱ्यातील ‘कास’ पठार दाखवण्यात आले होते.यंदाच्या संचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी झाला होता. या चित्ररथावर सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील फुले व प्राण्यांच्या प्रजातीचा समावेश करण्यात आला. कास पठाराचा चित्ररथात समावेश झाल्याने सातार्‍यासाठी ही बाब अभिमानास्पद आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाची संकल्पना सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहसंचालक मीनल जोगळेकर यांची होती. या चित्ररथाला प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांनी आवाज दिला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami