संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

राजस्थान सरकारची घोषणा! नोकरीत खेळाडूंना आरक्षण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जयपूर- राजस्थानातील अशोक गेहलोत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये खेळाडूंसाठी २ टक्के आरक्षण जाहीर केले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने आज ही माहिती दिली.
राजस्थान सरकारने नेहमीच खेळाडूंच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये २ टक्के आरक्षण दिले जाणार आहे. या शिवाय २२९ प्रतिभावंत खेळाडूंना आऊट ऑफ टर्न नोकऱ्या, प्रशिक्षक आणि पेन्शनची तरतूद सरकारने केली आहे. आंतरराष्ट्रीय पदक जिंकणाऱ्या खेळाडूंच्या बक्षिसाच्या रकमेत ३ कोटी रुपयांपर्यंत वाढ केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami