संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

राजापूरातील नेरकेवाडी येथे दुचाकीला मोटारीला धडक; महिलेचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

राजापूर- मुंबई-गोवा महामार्गावर नेरकेवाडी येथे कोळेकर फार्म हाऊससमोर मोटारीने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत स्वाराच्या पाठी बसलेल्या आईचा मृत्यू झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात काल सकाळी साडेनऊच्या सुमारास झाला. सविता सखाराम पुजारी (52) असे मृत महिलेचे नाव असून सुहास सखाराम पुजारी (25) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सुहास हा दुचाकीवर आई सविता हिला घेऊन नेरकेवाडीकडून राजापूरकडे येत होता. दुचाकी नेरकेवाडी येथील कोळेकर फार्मजवळ आली असता मुंबईकडून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगात येणार्‍या मोटारीने सुहासच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात सुहास व त्याची आई गंभीर जखमी झाली. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर जगदगुरु महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक समीर हळदणकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेने राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले. यावेळी सविता यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. तर सुहाच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami