कोल्हापुर – सुमारे ३१ वर्षापूर्वी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या शेतकरी चळवळीसाठी गावातील लोकांना एकत्र आणण्यासाठी हलगी वाजविणारा शिरोळ तालुक्यातील शिरटी येथील प्रसिद्ध हलगीवादक बयाजी गणू भोसले यांचे काल रात्री निधन झाले.भोसले यांना राजू शेट्टी यांच्या चळवळीचा साक्षीदार म्हणुन ओळखले जायचे.
मातंग समाजातील हलगीवादक बयाजी भोसले हे आपल्या शिरटी गावात कोणत्याही शुभ कार्यासाठी हलगी वाजवण्याचे काम करायचे.त्यासाठी ते लोकांकडून स्वेच्छेने मोबदला घ्यायचे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या चळवळ उभारताना गावागावातून फिरायचे. त्यावेळी माईकची सोय नसल्याने बयाजी भोसले हे गावात जावून हलगी वाजवायचे.हलगीचा आवाज ऐकून लोक मंदिरात सभेसाठी जमा व्हायचे. विशेष म्हणजे राजू शेट्टी यांच्या चळवळीसाठी इतर लोकांसारखी बयाजी यांनी त्यावेळी १० रुपये मदत म्हणून दिले होते. ते १० रुपये राजू शेट्टी आजपर्यंत जेव्हा जेव्हा शिरटी गावात जायचे.तेव्हा ते १० रुपये बयाजीला देऊनच ते पुढे जायचे.अशा या मनमिळाऊ आणि अंगाने सडपातळ आणि काटक असलेल्या बयाजी भोसले यांनी अखेर पर्यत हलगी वाजवून ग्रामस्थांची सेवा केली आहे.