संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिने सश्रम कारावासाची शिक्षा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अमरावती -विधानसभा निवडणुकीत संपत्तीची माहिती देताना मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवणे राज्यमंत्री बच्चू कडू यांना चांगलेच भारी पडले आहे. या प्रकरणी अमरावती येथील चांदूरबाजार न्यायालयाने त्यांना बच्चू कडू यांना २ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

बच्चू कडू यांचा मुंबईत ४२ लाख ४६ हजारांचा मालकी हक्काचा फ्लॅट आहे. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या संपत्तीच्या विवरण पत्रात त्यांनी या फ्लॅटची माहिती लपवली होती. त्यामुळे भाजपचे नगरसेवक गोपाल तीरमारे यांनी माहितीच्या अधिकारात याबाबतची सर्व माहिती मिळवून २०१७ मध्ये बच्चू कडू यांच्या विरोधात आसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यात म्हटले होते की, बच्चू कडू यांनी २०११ मध्ये अंधेरी येथे सदनिका विकत घेतली होती. पण निवडणूक अर्ज भरताना जे शपथपत्र दिले होते, त्यात ही माहिती लपवली होती. त्यानंतर बच्चू कडू यांच्या विरुद्ध लोकप्रतिनिधी कायदा कलम १२५ [अ ] अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र त्यावेळी बच्चू कडू यांनी आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळले होते. त्यांचे म्हणणे असे होते की राजयोग सोसायटीने सर्व आमदारांना घरे उपलब्ध करून दिली होती. त्यासाठी बँकेचे ४० लाख रुपयांचे कर्जही उपलब्ध करून देण्यात आले होते. पण कर्जाची परतफेड न होऊ शकल्याने चार महिन्याच्या आधी तो फ्लॅट विकण्यात आला होता असा खुलासा बच्चू कडू यांनी केला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यामुळे पुढे या प्रकरणी चान्दुर बाजारच्या दिवाणी न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकील वानखेडे यांनी सर्व का पुरावे न्यायालयात सदर केले ते ग्राह्य मानून न्यायालयाने बच्चू कडू यांना २ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami