संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 06 February 2023

राज्यांत स्थिर सरकार काँग्रेसला नकोय
सोलनच्या सभेमध्ये मोदींचा हल्लाबोल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सोलन- हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जोरदार जाहीर सभा सुरु झाल्या आहे. आज दुपारी हिमाचल प्रदेशच्या सोलनमध्ये सभा घेत लोकांना संबोधित करताना मोदी म्हणाले की,हिमाचल प्रदेशमधील आधीच्या काँग्रेस सरकारने स्वार्थापायी राज्यात स्थैर्य नांदू दिले नाही. याच कारणासाठी लहान राज्यांमध्ये स्थिर सरकार काँग्रेसला नको आहे.
पुढे नरेंद्र मोदींनी सांगितले की,भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण आहे हे लक्षात ठेवण्याची गरज नाही. तुम्ही केवळ कमळाचे फुल लक्षात ठेवा. मी हे फुल घेऊन तुमच्याकडे आलो आहे. मतदान करताना कमळाचे फुल दिसल्यास भाजपा आहे हे समजून घ्या, दिल्लीप्रमाणेच या राज्यातही मोदींना मजबूत करायचे आहे का नाही? हिमाचल प्रदेशमधील आधीच्या काँग्रेस सरकारने स्वार्थापायी राज्यात स्थैर्य नांदू दिले नाही. याच कारणासाठी लहान राज्यांमध्ये स्थिर सरकार काँग्रेसला नको आहे. काँग्रेस म्हणजे अस्थिरता, काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, काँग्रेस म्हणजे स्वार्थ आणि काँग्रेस म्हणजे घराणेशाही`, तीन दशकांच्या अस्थिरतेमुळे देशाची विकासात पीछेहाट झाला आहे. तरुणांना आणि शेतकऱ्यांना आश्वासनानुसार कर्जमाफी न देता त्यांचा विश्वासघात करण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे. मात्र, भाजपाने सत्तेत येताच शेतकऱ्यांना भरघोस मदत केली असून त्यांचे जीवनमान उंचावले असल्याचे मोदी यांनी म्हटले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami