संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

राज्यांनो निर्बंध शिथिल करा; केंद्र सरकारचे पत्र

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्‍ली – कोरोना रुग्णामध्ये मोठी प्रमाणात घट झाली असल्याने केंद्र सरकारने आता सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्याचे आदेश दिले असून याबाबतचे पत्र केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवले आहेत.

या पत्रात राजेश भूषण म्हणाले की, देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून रुग्णसंख्या देखील कमी झाली आहे. जगातील देखील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने 10 फेब्रुवारीपासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवे नियम लागू केले आहे. सरकारच्या नव्या नियमावलीनुसार विदेशातून येणार्‍या प्रवाशांसाठी क्वारंटाईनचे बंधन नसणार आहे.

सुरूवातीच्या काळात कोरोनाची वाढती सख्या पाहता अनेक राज्यांनी विमानतळांवर आणि राज्यातील सीमांवर निर्बंध लावण्यात आले होते. दरम्यान जिथे कोरोना महामारीच्या काळात आरोग्य व्यवस्था हातळण्यासहच राज्याचे अर्थचक्र न थांबता कसे सुरळीत चालेल याची देखील काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या देशात कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे राज्यांनी कोरोनाची परिस्थिती पाहून निर्बंध शिथिल करावे, मात्र असे करत असताना राज्यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी करण्याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी पाच टप्प्यांचे धोरणाची देखील अंलबजावणी करता येऊ शकते. यासाठी राज्य टेस्ट, ट्रॅक, ट्रीट, वॅक्सीनेशन आणि कोरोना अनुरुप व्यवहार यासारखे नियम लावण्यात येऊ, असे आपल्या पत्रात भूषण यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami