मुंबई- राज्याच्या अनेक जिल्ह्यात तापमानात घट झाली असून पहाटे जोराची थंडी वाजत आहे तर दुपारी उन्हाचा चटका वाढला आहे. कमाल आणि किमान तापमानात चढ उतार सुरु आहे. राज्याचे किमान तापमान 11 ते 22 अंशाच्या दरम्यान असून नाशिकचे सकाळी आठ वाजता तापमान 19 अंश आणि पुण्याचे तापमान 20 अंश राहिला. मुंबईत तापमानाचा पारा 23.8 इतका राहिला. त्यामुळे तेथील थंडीचा जोर वाढला आहे.
तसेच सोलापूरमध्ये तापमान 17. 8 अशांवर तर अकोलात 20.6 आणि अमरावतीत 21.6 अंशांवर तापमान पोहोचले आहे. महाराष्ट्रात तापमान पारा घसरत असल्याने ग्रामीण भागातील लोक सकाळी शेकोटी पटवत आहे. दरम्यान, रायलसीमा आणि केरळमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लक्षद्वीपमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.