संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

राज्यातील पहिली जैव सुरक्षा प्रयोगशाळा नाशिकमध्ये! आज लोकार्पण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नाशिक- देशातील रेल्वे आणि रस्ते जोडले गेले नसलेल्या दुर्गम भागासाठी जैव सुरक्षा प्रयोगशाळा (मोबाइल व्हॅन) तयार करण्यात आली आहे. आता उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रात प्रथमच अशी व्हॅन नाशकात उपलब्ध होणार आहे.जवळपास 25 कोटींच्या या मोबाईल व्हॅनचे केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री भारती पवार यांच्या हस्ते उद्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता महाकवी कालिदास कला मंदीरातील कार्यक्रमादरम्यान लोकार्पण होणार आहे.

कोविडसारख्या इतरही सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म जिवाणूंपासून होणारे संभाव्य प्राणघातक आजार टाळण्यासाठी प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशनच्या वतीने बीएसएल-3 कंटेनमेंट प्रयोगशाळा बनविण्यात आली आहे. उद्या होणार्‍या कार्यक्रमावेळी डीएचआर आणि आयसीएमआरचे महासंचालक प्रा.डॉ. बलराम भार्गव, डीएचआर, सहसचिव अनु नगर आयसीएमआर- एनआयव्हीचे शास्त्रज्ञ तसेच नाशिक येथील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जैव-सुरक्षा सज्जता आणि महामारी संशोधनाला बळकटी देण्यासाठी देशात चार मोबाईल जैव सुरक्षा स्तर -3 प्रयोगशाळा प्रदान करण्यात येणार आहेत. या प्रयोगशाळांमध्ये निदान आणि संशोधनाशी सुसंगत सुविधा व उपकणे आहेत. ज्यात देशी आणि विदेशी सूक्ष्मजीव यावर संशोधन करण्यात येणार आहे.
यातील कर्मचार्‍यांना व्यापक प्रशिक्षण दिले जाणार असून ही प्रयोगशाळा मोठ्या आरोग्य सेवा आणि संशोधन संस्थांशी संलग्न असेल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami