संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

राज्यात आज १ हजार ४३७ नव्या कोरोना बधितांची नोंद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा घटत आहे. आजही नव्या रुग्ण संख्येत कालपेक्षा कमी रुग्ण सापडले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात एक हजार 437 नवे रुग्ण आढळले आहेत. शनिवारी राज्यात एक हजार 635 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर तीन हजार 375 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीत सहा रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शनिवारी राज्यात 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. दैनंदिन कोरोना रुग्णांप्रमाणे कोरोना मृत्यूच्या संख्येतही घट दिसत आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.91 टक्के आहे.  सध्या राज्यात  2 लाख 4 हजार 942 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1068  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  

राज्यातील एकूण अक्टिव कोरोना रुग्णांची संख्या 16 हजार 422 इतकी आहे. राज्यात सात कोटी 72 लाख 32 हजार 001 कोरोना चाचण्या आतापर्यंत करण्यात आल्या आहेत. त्यापैकी राज्यात आतापर्यंत 78 लाख 58 हजार 431 कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. तर राज्यात आजपर्यंत 76 लाख 94 हजार 439 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एक लाख 43 हजार 582 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami