संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

राज्यात कोरोनाच्या नव्या तीन विषाणूंचा शिरकाव

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : कोरोनाचे संकट दूर झाल्यामुळे सर्वत्र दिवाळीची जय्यत तयारी सुरु असताना, पुन्हा एकदा एक चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. राज्यात कोरोनाच्या तीन विषाणूचा शिरकाव झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्याची माहिती समोर आली आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार एक्सबीबी हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट राज्यात आढळून आला असून यामुळे रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती कमी होत असल्याचे बोलले जात आहे. तसेच महाराष्ट्रात बीए २.३.३० आणि बीक्यू.१ हे नवे व्हेरिएंट शिरकाव करत असल्याचे समोर आले आहे.

राज्यातील कोव्हिड रुग्णसंख्या मागील आठवड्याच्या तुलनेत १७.७ टक्क्यांनी वाढली असून ठाणे, रायगड आणि मुंबई भागामध्ये ही वाढ अधिक ठळक प्रमाणात दिसत असल्याचे तज्ञाचे मत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हिवाळ्यामध्ये हे प्रमाण वाढू शकते असा इशाराही काही तज्ज्ञांनी दिला आहे. कोविडचा नवीन व्हेरिअंट भारतात देखील आढळून आला आहे. नुकताच ओमायक्रॉनच्या आणखी एका उप-प्रकाराचे रुग्ण देशात सापडले आहेत. या व्हेरिअंटला एक्सबीबी असे नाव देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतातील अनेक राज्यांमध्ये या नव्या व्हेरिअंटचे रुग्ण आढळून आले आहेत. ओमिक्रोन चे नवीन व्हेरिएंट बीएफ.७ आणि बीए .५.१.७ आहेत. ओमिक्रॉनच्या या संसर्गजन्य प्रकाराच्या नवीन व्हेरिएंटमुळे लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात बीए. २.७५चे प्रमाण ९५ टक्के वरून ७६% वर आले आहे. तर एक्सबीबी हा नवीन व्हेरिएंट राज्यात आढळला असून त्याचे प्रमाण वाढताना दिसतंय, हा व्हेरियंट बीए.२.७५ पेक्षा अधिक वेगाने पसरू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. फ्ल्यू सारखा कोणताही आजार अंगावर काढू नका, तातडीने वैद्यकीय सल्ला घ्या आणि त्यानुसार उपचार करण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना दिल्या आहेत. भारतात तमिळनाडूमध्ये एक्सबीबी चे रूग्ण आढळून आले. तसेच महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तमिळनाडूमध्ये नव्या व्हॅरिएंटच्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami