परभणी – संपूर्ण महाराष्ट्रात आज शनिवार १७ ते २६ डिसेंबर दरम्यान असे १० दिवस हवामान कोरडे राहून थंडी पडणार असल्याचा अंदाज मराठवाडय़ातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तविला आहे.
पंजाबराव डक यांच्या हवामान अंदाजानुसार,या काळात विदर्भात हवामान कोरडे आणि सर्वत्र दाट धुके जाणवणार आहे. मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र,दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात साधारण अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.२१ आणि २२ डिसेंबरला अंशतः ढगाळ वातावरण राहून दहा दिवस हवामान कोरडे राहणार आहे.मात्र हा सर्व अंदाज असून वार्यात बदल झाला की वेळ,ठिकाण आणि दिशा बदलत राहते असे हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी म्हटले आहे.