संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

राज्यात पुढील ४ दिवस मुसळधार सहा जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट” जारी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा जोर धरला आहे. दोन दिवसापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.आता पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मंगळवारी आणि बुधवारी कोल्हापूर, पुणे,सातारा,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
येत्या दोन दिवसात राज्यातील बुततांश भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांसारख्या किनारी जिल्ह्यांतील निर्जन भागांमध्ये येत्या शुक्रवार ते रविवार या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तण्यात आली आहे.तर पुण्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.कोल्हापुरात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पंचगंगा धरणाचे काल स्वयंचलित दरवाजे उघडले होते, त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami