संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

राज्यात पुन्हा १ हजारपेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – राज्यात आता कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. काल दिवसभरात कोरोनाचे ७८२ रुग्ण आढळून आले, तर दोन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. यासह राज्यातील कोरोनाबळींचा आकडा आता १ लाख ४३ हजार ६९७ वर पोहोचला आहे.

तसेच काल १ हजार ३६१ कोरोना रुग्ण बरे झाले, त्यामुळे राज्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७७ लाख १० हजार ३७६ वर पोहोचली आहे. तर सध्या ७ हजार २२८ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०३% एवढे झाले असून सध्या १ लाख ३६ हजार ४४५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर ७४४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. महत्त्वाचे म्हणजे राज्यात काल ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नाही.

आजपर्यंत राज्यात एकूण ४ हजार ६२९ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४ हजार ४५६ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami