मुंबई – राज्यात कोरोना संकट आणि नैसर्गिक आपत्तीमुळे प्रलंबित राहिलेल्या २० हजार ६३८ सहकारी संस्थांच्या निवडणूक जाहीर करण्यात आल्या आहेत.ही निवडणुक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्यांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे १ एप्रिल २०२१ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत निवडणुकीस पात्र असलेल्या अ, ब, क आणि ड वर्गातील संस्थांच्या निवडणुकीची प्रकिया १ मार्चपासून सुरू होणार असल्याची माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी दिली.
राज्यात आलेले कोरोनाचे संकट नियंत्रणात येताच शेतकर्यांना प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्ज माफी योजना राबविली.त्यामुळे या संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. या निवडणूक प्रक्रियेत प्रामुख्याने राज्यातील २८ सहकारी साखर कारखाने, ३ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि २६ सहकारी सूतगिरण्यांचा समावेश आहे.या संस्थांच्या निवडणुकांसाठी १ फेब्रुवारी २०२३ या अर्हता दिनांकावर प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत.
ज्या सहकारी संस्था निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी सादर करणार नाहीत किंवा पुरेसा निवडणूक निधी उपलब्ध करणार नाहीत अशा संस्थांवर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० नियम १९६१ आणि महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०२४ अंतर्गत कारवाई करण्याबाबतचे आदेश देखील जिल्हा सहकारी निवडणूक अधिकार्यांना देण्यात आलेले आहेत.या आदेशानुसार अ, ब, क व ड वर्गातील अनुक‘मे ६३,१ हजार १४, १० हजार १६३ आणि ९ हजार ३९७ अशा एकूण २० हजार ६३८ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्या आहेत,असे खंडागळे यांनी सांगितले.