संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

राज्यामध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे.कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात तसेच नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.दरम्यान, या ऑक्टोबर महिन्यातही पाऊस सक्रिय राहणार असून ‘ नुरू ” या सुपर चक्रीवादळामुळे पाऊस परतण्यास विलंब झाला आहे.

सध्या सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यामध्ये पावसाळी वातावरण दिसत आहे. महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला असला तरी येत्या ५ ऑक्टोबरपासून उत्तर प्रदेश,
पूर्व राजस्थान,मध्य प्रदेश,दिल्ली आणि हरियाणा या राज्यात पावसाची नवीन फेरी सुरू होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावर ईशान्य दिशेने तयार झालेले चक्रीवादळ मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे गंगेच्या मैदानात चांगला पाऊस होईल. वास्तविकता मान्सून हा २० सप्टेंबरपासून काढता पाय घेत असतो.मात्र यंदा तो १३ ऑक्टोबरपर्यंत मान्सून थांबण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या अनेक भागात पुढील आठवड्यात हलका पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami