संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 30 January 2023

राज्य सरकारी कर्मचार्‍यांसाठी
आगामी वर्षांत २४ सार्वजनीक सुट्ट्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी २०२३ या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार आगामी वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण २४ सुट्ट्या मिळाल्या आहेत.मात्र,त्यातील चार सुट्ट्या शनिवार आणि रविवार आल्यामुळे बुडाल्या आहेत.
प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी,महाशिवरात्री १८ फेब्रुवारी,छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारी,होळी ७ मार्च, गुढीपाडवा २२ मार्च, रामनवमी ३० मार्च, महावीर जयंती ४ एप्रिल, गुड फ्रायडे ७ एप्रिल, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल, महाराष्ट्र दिन १ मे, बुद्ध पौर्णिमा ५ मे, बकरी ईद २८ जून, मोहरम २९ जुलै, स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट, पारसी नववर्ष दिन १६ ऑगस्ट, गणेश चतुर्थी १९ सप्टेंबर, ईद ए मिलाद २८ सप्टेंबर, महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर, दसरा २४ ऑक्टोबर, दिवाळी लक्ष्मीपूजन १२ नोव्हेंबर, गुरूनानक जयंती २७ नोव्हेंबर, ख्रिसमस २७ डिसेंबर अशा मिळून २४ सार्वजनिक सुट्ट्या सरकारने जाहीर केल्या आहेत.महाशिवरात्री, रमझान ईद आणि मोहरम हे सण शनिवारी तर छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि दिवाळी लक्ष्मीपूजन रविवारी असल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या या हक्काच्या चार सुट्ट्या बुडाल्या आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami