सोलापूर – राज्य सरकारच्या महसूल विभागाने आता तुकडेबंदी आणि तुकडेजोड कायद्याच्या कडक अटींमुळे शेतकऱ्यांच्या कमी क्षेत्राच्या जमीन खरेदी विक्री व्यवहारासाठी त्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार बागायती दहा गुंठे आणि जिरायती एक एकरातील जमिनीच्या खरेदी -विक्री व्यवहाराला परवानगी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.ऑगस्ट महिन्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
या निर्णयामुळे सरकारच्या महसुलात वाढ होणार आहे.जमिनीच्या किंमती वाढल्याने मोठ्या क्षेत्राचे तुकडे करून जमीन खरेदी-विक्री करण्यावर अनेकांचा भर दिसत आहे.मात्र तुकडेबंदी आणि तुकडेजोड कायद्यातील कडक निकषांमुळे ते अवघड बनले आहे.अनेक शेतकऱ्यांना मुलांचे शिक्षण ,मुलींचे लग्न आणि अन्य कौटुंबिक कारणासाठी थोडी फार जमीन विकावी लागत आहे.पण ती त्याळा विकता येईना.त्यामुळे बागायती किमान १० गुंठे आणि जिरायती किमान २ एकर जमीन खरेदी -विक्री व्यवहारास परवानगी मिळावी म्हणून ७५ ते ८० जणांनी याबाबत आपल्या हरकती महसूल विभागाकडे नोंदविल्या आहेत.तसेच असे व्यवहार ठप्प झाल्याने सरकारचा महसूलही बुडत आहे.त्यामुळे आता सरकारने या मागणीला मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.सध्या शासनाच्या नियमाप्रमाणे बागायती २० गुंठे आणि जिरायती किमान ८० गुंठे जमीनीची खरेदी -विक्री करता येते.त्यामुळे आता यासंदर्भात शासनानेच हरकती मागविल्या असुन तीन महिन्यात निर्णय घेतला जाणार आहे.