मुंबई- अभिनेते राज कपूर यांचा चेंबूर येखील बंगला गोदरेज समूहाची रिअल इस्टेट कंपनी गोदरेज प्रॉपर्टीजने खरेदी केला आहे. ही कंपनी राज कपूर यांच्या बंगल्याच्या जागी प्रीमिअर रेसिडेंशियल प्रॉपर्टी बांधणार आहे. गोदरेज प्रॉपर्टीजने ही डिल किती रुपयांमध्ये केली,याबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. गोदरेज प्रॉपर्टीजचे सीईओ गौरव पांडे यांनी सांगितले की, या डीलमुळे आम्ही आनंदी आहोत. यासाठी आम्ही कपूर कुटुंबाचे आभार मानतो.