राज कुंद्रा आणि रायन थारपला जामीन मंजूर; शहराबाहेर जाण्यासाठी पोलिसांची परवानगी

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला कोर्टाचा आज दिलासा मिळला आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयाने पोर्नोग्राफी प्रकरणात 19 जुलैपासून तुरुंगात असलेल्या राज कुंद्रा यांच्यासह त्याचा आयटी प्रमुख रायन थारपचा जामीन मंजूर केला आहे. राज कुंद्राला 50,000 रुपयांच्या जामिनावर जामीन मंजूर केला आहे. मात्र स्थानिक पोलीस ठाण्याला कळविल्याशिवाय त्याला शहर सोडता येणार नाही , अशी अट न्यायालयाने जामीन मंजूर करताना घातली आहे.

या प्रकरणात कुंद्रासह 11 आरोपींविरोधात 1500 पानी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी, शर्लिन चोप्रासह 43 साक्षीदारांचे जबाब आरोपपत्रात समाविष्ट करण्यात आले आहेत. या आरोपपत्रानंतर कुंद्राच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला. यापूर्वी 28 जुलै रोजी किल्ला न्यायालयाने राज कुंद्राची जामीन याचिका फेटाळला होता. राज कुंद्रा शक्तिशाली असून या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्यामुळे तो तपास आणि साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो. आणि तो पुरावा नष्ट करू शकतो, असा युक्तिवाद कोर्टात त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यासाठी करण्यात आला होता.

कोर्टानेही तो ग्राह्य ठरवून अजूनपर्यंत त्याचा जामीन मंजून केला नव्हता. भादवी कलम 292, 296 – अश्लील साहित्य बनवणे आणि विकणे, कलम 420 – विश्वासघात, फसवणूक माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम 67, 67 (अ) – इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील साहित्य टाकणे आणि प्रसारित करणे महिलांचे भेदभावपूर्ण प्रतिनिधित्व (निषेध) कायदा, कलम 2 (जी ) 3, 4, 6, 7 – महिलांशी संबंधित अश्लील चित्रपट बनवणे, विकणे आणि प्रसारित करणे. आदी गुन्हे राज कुन्द्रावर दाखल आहेत. इंटरनेटद्वारे पोर्नोग्राफीचा व्यापार सध्या झपाट्याने वाढला आहे. पोर्नोग्राफीमध्ये फोटो, व्हिडिओ, मजकूर, ऑडिओ सारख्या गोष्टींचा समावेश आहे. असे साहित्य इतर कोणास प्रकाशित करणे किंवा पाठवणे हे पोर्नोग्राफी विरोधी कायद्याच्या अधीन आहे.अश्लील व्हिडिओ बनवणे हा गुन्हा आहे. इतरांचे अश्लील व्हिडिओ बनवणे, एमएमएस तयार करणे, इतरांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने असे साहित्य पाठवणे किंवा एखाद्याच्या इच्छेविरुद्ध अश्लील संदेश पाठवणे या कायद्यात समाविष्ट आहे. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पोर्नोग्राफी प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे बेकायदेशीर आहे. अश्लील साहित्य पाहणे, वाचणे किंवा ऐकणे बेकायदेशीर नाही.

Close Bitnami banner
Bitnami