संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

राज ठाकरेेंची जळगाव कोर्टाकडून निर्दोेष मुक्तता

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जळगाव- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या तीन पदाधिकार्‍यांना जळगाव कोर्टाने मोठा दिलासा आहे. रेल्वेत मराठी मुलांच्या भरतीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनाप्रकरणी राज ठाकरेंसह तिघांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. जळगाव कोर्टाच्या या निर्णयावर मनसैनिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

मुंबई येथे रेल्वेत मराठी मुलांची भरती करण्यात यावी, यासाठी मनसेतर्फे केलेल्या आंदोलनानंतर राज ठाकरेंना 2008 मध्ये रत्नागिरीतल्या खेडमध्ये अटक करण्यात आली होती. या अटकेचे पडसाद 21 ऑक्टोबर 2008 रोजी संपूर्ण राज्यासह जळगावतही उमटले होते. या अटकेच्या निषेधार्थ जळगावात मनसे पदाधिकार्‍यांनी मोर्चा काढून बंद पुकारला होता. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित प्रकरणात वॉरंट बजावल्यानंतर न्यायालयाने राज ठाकरे यांना 15 हजारांचा जामीन मंजूर केला होता. तसेच या खटल्याच्या कामात कायमची गैरहजर राहण्याची परवानगीही दिली होती.

दरम्यान, सुनावणीअंती आज जळगाव न्यायालयाने या खटल्यात राज ठाकरे यांच्यासह मनसेचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. जमील देशपांडे, रज्जाक सय्यज, प्रेमानंद जाधव यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यात मनसेच्या वतीने वकील संदीप पाटील यांनी कामकाज पाहिले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami