मुंबई – कोरोना रुग्णवाढीत घट झाल्यामुळे मुंबईतील कोरोनाचे निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे भायखळा येथील राणीची बाग १० फेब्रुवारीपासून पर्यटकांसाठी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. राज्य शासनाने नव्या गाईडलाईनमध्ये कोरोनाचे नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
मुंबईतील भायखळा येथील राणीची बाग पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. कोरोनामुळे ती बंद केली होती. मात्र आता १० फेब्रुवारीपासून राणीची बाग पर्यटकांसाठी पुन्हा खुली होणार आहे. तसा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. पर्यटकांची गर्दी टाळण्यासाठी बागेच्या तिकीट खिडक्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.