संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

राणीच्या बागेत येणार जिराफ, झेब्रा; यंदाच्या अर्थसंकल्पातून ११५.४६ कोटींची तरतूद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबईचा यंदाचा अर्थसंकल्प आजच सादर झाला. यात मुंबईतील प्रसिद्ध वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीच्या बागेसाठी ११५.४६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीतून जिराफ, झेब्रासारखे विदेशी प्राणीसुद्धा राणीबागेत आणण्यात येणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून राणीच्या बागेत आधुनिकीकरण केले जात आहे. २०२०-२१ मध्ये या कामांकरिता १४३ कोटींचा खर्च करण्यात आला होता. आता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात त पाणमांजर, सांबर व कांकर आणि नीलगाय चौशिंगा या तीन प्राणी प्रदर्शनींचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. इंटरप्रिटेशन सेंटर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दर्शकांकरिता मुंबईतील जैववैविध्य दर्शविणारी सुविधा कृत्रिमरित्या विकसित करण्यात आली असून त्याअंतर्गत गेट वे ऑफ इंडिया, नॅशनल पार्क, कांदळवनक्षेत्र, चौपाटी, शिवडी खाडी, फ्लेमिंगो इ. च्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत, सदर सुविधेमध्ये दर्शकांना व्हिडिओ वॉल, ३डी चलतचित्रे अशा माध्यमातून या विविध ठिकाणांची व्हर्चुअल टूर घेता येईल.

प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये प्राणीसंग्रहालयालगतच्या दोन भूखंडावर (सुमारे १० एकर) प्राणिसंग्रहालयाच्या विस्तारीकरणांतर्गत विदेशी प्राण्यांचे अधिवास तयार करण्यात येणार असून त्यामध्ये विदेशी प्रजातीच्या जसे की, जिराफ, झेबा, सफेद सिंह, जॅग्वार इ. प्राण्यांकरिता प्रदर्शनी तयार करण्यात येणार आहेत. विनंती प्रस्तावाद्वारे निविदा प्रक्रिया करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सन २०२१-२२ च्या सुधारीत अर्थसंकल्पात ₹३०.६६ कोटी आणि सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ₹११५.४६ कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami