मुंबई – अभिनेत्री दिशा सॅलियन आत्महत्याप्रकरण पुन्हा चर्चेत आल्याने तिच्या आई-वडिलांनी आज मुंबईतील राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची आज भेट घेऊन चर्चा केली. दिशाबाबत माध्यमातून खोटी माहिती जाहीर करणार्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे आणि इतर सर्व संबंधितांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी केली असल्याचे चाकणाकरांनी सांगितले.
या भेटीनंतर चाकणकर म्हणाल्या की, दिशाच्या आई-वडीलांनी आपल्या मुलीच्या मृत्यू पश्चात होणारी बदनामी ही त्यांच्यासाठी अत्यंत वेदनादायी असल्याचे आम्हाला संगितले. दिशाच्या मृत्यूबद्दल माध्यमातून खोटी माहिती जाहीर करणार्या नारायण राणे, नितेश राणे आणि इतर सर्व संबंधितांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी आमच्या केली आहे. या मागणीची आयोगाने गंभीर दखल घेतली असून याबाबत सालियान कुटुंबियांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी आयोग कटिबद्ध असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.
दिशा सालियान यांच्या आईवडिलांनी आज महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या मुख्य कार्यालयात अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेतली.
— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) February 23, 2022
यादरम्यान त्यांनी आपल्या मुलीची तिच्या मृत्यू पश्चात होणारी बदनामी ही त्यांच्यासाठी अत्यंत वेदनादायी असल्याचे सांगितले(1/3) pic.twitter.com/IGcsbB4Owl