‘रात्रीस खेळ चाले ३’मधील शेवंताचा रामराम! गंभीर खुलासा करत अपूर्वाने मालिका सोडली

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – कोकणातील जीवनशैली, भाषा, तेथील भूताटकी यावर सुरू असलेली झी मराठीवरील मालिका ‘रात्रीस खेळ चाले ३’ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतील सर्वच पात्र आपापली भूमिका उत्तम निभावत आहेत. मात्र या मालिकेच्या तीनही सिझनमध्ये प्रेक्षकांना वेड लावले ते ‘शेवंता’ने. मालिकेत शेवंताची भूमिका अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने अतिशय उत्तम निभावली. मात्र यापुढे ती या मालिकेत दिसणार नाही. काही ज्युनियर सहकलाकारांकडून मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे अपूर्वाने ही मालिक सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर शेवंताच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील शेवंताच्या पात्रासाठी अपूर्वाला १० किलो वजन वाढवावे लागले होते. मात्र या वाढलेल्या वजनामुळे मालिकेतील ज्युनियर कलाकारांकडून अपूर्वाचे वारंवार विडंबन केले जात होते. उघडपणे खिल्ली उडवत जिव्हारी लागतील अशा कमेंट्स पास केल्या जात होत्या. वरिष्ठांकडे कारवाई केल्यानंतही या कलाकारांकडून दिलगिरी व्यक्त केली जात नव्हती. तसेच प्रोडक्शन हाऊसकडून आठवड्यातून ५ ते ६ दिवसांचे शुटिंग असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच चॅनेलकडून आणखी एक शो देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात आठवड्यात एकच दिवस शुटिंग व्हायचे आणि बाकी पुढचे ३-४ दिवस बसून राहावे लागायचे. चॅनेलकडून दुसरा शो देण्याचे आश्वासनही पाळले गेले नाही. या सर्व कारणांमुळे त्रस्त झाल्याने अपूर्वाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.

अपूर्वाने इंस्टाग्रामवरून मालिका का सोडली याबाबत खुलासा केला आहे. मी अत्यंत प्रामाणिकपणे चॅनेलशी एकनिष्ठ राहून काम केले. परंतु माझ्या कष्टाचा मोबदला मिळत नसेल आणि माझी अवहेलना होत असेल. नवख्या कलाकारांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर अशा ठिकाणी काम करणे आपल्या तत्त्वात बसत नसल्याचे अपू्र्वाने म्हटले आहे. तसेच ‘या सर्व पार्श्वभूमीवर, माझ्या जिव्हाळ्याच्या शेवंतातून मला बाहेर पडावे लागले. दुर्दैव आहे परंतु हा सर्वस्वी माझा वैयक्तिक निर्णय आहे. आयुष्य इथेच थांबले नाही. आणखीन काही नवीन रोल्स मी करत राहीन आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच सदैव होत राहील, अशी मी आशा करते. हीच एकमेव प्रेरणा आहे’, असेही तिने नमूद केले.

Close Bitnami banner
Bitnami