संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

राधानगरी धरणात 80 टक्के पाणीसाठा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर- गेल्या 15 दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याला गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसाने मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उभ्या पिकांना वरदान मिळाले आहेच, त्याचबरोबर धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत आहे. राधानगरी धरणामध्ये आतापर्यंत 80 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास या आठवड्यामध्ये धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासांमध्ये धरण परिसरामध्ये 238 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

संभाव्य पूरस्थितीचा अंदाज घेऊन पाटबंधारे विभागाकडून वीजनिर्मितीसाठी 1 हजार 600 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तब्बल गेल्या दोन आठवड्यांपासून पूर्णत: दडी मारलेल्या मान्सूनने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा एन्ट्री केली आहे. गेल्या 24 तासांपासून जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस झाल्याने सोयाबीन तसेच भुईमूग पिकाला विशेष करून जीवदान मिळाले आहे. शहरासह जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्याचबरोबर उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या होत्या. त्यामुळे हाताला आलेली उभी पिके जातात की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र गेल्या 24 तासांत झालेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami