संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

रामतीर्थ तलावात मृत माशांचा कुजलेल्या अवस्थेत खच

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

चिपळूण : चिपळू शहरातील ऐतिहासिक रामतीर्थ तलावात शेकडो मृत मासे कुजलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असल्याचे समोर आले होते. तलावातील मासे अचानक मृतावस्थेत आढळून आल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यावरणप्रेमींकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यास आला आहे. तलावातील पाण्याचा रंगही बदलला होता. त्यामुळे या तलावातील पाण्यात कोणीतरी रासयनिक द्रव्य टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, याची माहिती मिळताच तत्काळ चिपळूण नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांनी तलावाची स्वच्छता केली. शहरातील मध्यवर्ती भागात हे ऐतिहासिक तलाव आहे. तलाव परिसरात दुर्गंधी येऊ लागल्यामुळे पालिकेने मृत मासे बाहेर काढून तलाव स्वच्छ केले. काही दिवसांपूर्वी विरेश्वर तलावात मासे मेल्याची घटना घडली होती. विरेश्वर तलावातील दीर्घकाळ जपलेले हे पाळू जातीची मासे होते. तलावातीलहे मासे अचानक मेल्याची घटना समोर आल्यांनतर पालिकेने तलावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यातच आता रामतीर्थ तलावातील मासे मेल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळाल्यांनतर आरोग्य निरीक्षक महेश जाधव व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी गेले. होडीच्या साहाय्याने मेलेले मासे बाहेर काढून तलावाची स्वच्छता करण्यात आली. या तलावाच्या परिसरात रामतीर्थ बाग आहे. येथे लोक फिरण्यासाठी येतात. तसेच तलाव परिसरात मद्यपींचा अड्डा तयार झाला आहे. त्यामुळे या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे कार्यकर्ते निहार कोवळे यांनी केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami