संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 30 January 2023

रामदासांच्या देवघरातील मूर्ती चोरणाऱ्या दोघांना अटक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जालना – जालना जिल्ह्यातील जांब समर्थ येथील समर्थ रामदासांच्या देवघरातील मूर्ती चोरी प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक झाली असली तरी पोलीस मुख्य आरोपीच्या मागावर आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून रामदासांच्या हनुमानाच्या मूर्ती जप्त केल्या.
जालनामधील समर्थ रामदासांच्या जन्मगावी जांब समर्थ येथील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती ऑगस्ट महिन्यात चोरीला गेल्या होत्या. मंदिरातून 450 वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्याने एकच खळबळ माजली होती. 22 ऑगस्ट रोजी चोरी गेलेल्या राम मूर्तीचा तपास आधी जालना स्थानिक गुन्हे शाखेकडे होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे वर्ग करण्यात आला. याप्रकरणी आता तपासात दोन महिन्यांनंतर मोठं यश आले. अथक प्रयत्नानंतर एसआयटी पथकाने आता कर्नाटक आणि सोलापूरमधून दोन आरोपींना अटक केली. चोरीला गेलेल्या ऐतिहासिक मूर्तींपैकी काही मूर्ती पोलिसांनी आरोपींकडून जप्त केल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे चोरांनी या ऐतिहासिक मूर्ती 25 हजारात विकल्या होत्या. मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी आरोपींकडून एक ऐतिहासिक मूर्ती परत मिळवली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami