संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

रामदास आठवलेंनी शशी थरूरांना दिले इंग्रजीचे ज्ञान! ट्विटमधील चुकांवर बोट

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर इंग्रजीचे जाणकार म्हणून ओळखले जातात. त्यांचे इंग्रजीतील शब्द कधीकधी चांगल्या भाषांतरकारांनाही चक्रावून टाकतात. चमकदार भाषणासाठी संसदेतही ते प्रसिद्ध आहेत. मात्र गुरुवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी थरूरांनाच इंग्रजीचे धडे दिले. ट्विटरवर केलेल्या चुकांवर बोट ठेवले. गुरुवारी संसदेत केलेल्या भाषणात रामदास आठवले यांनी थरूरांना ‘बजेट’ आणि ‘रिप्लाय’ या शब्दांची लिहिलेली चुकीची स्पेलिंग दाखवली. त्यामुळे सभागृहात खसखस पिकली.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अर्थसंकल्प मांडत होत्या. त्यावेळी त्यांनी जवळपास २ तास भाषण केले. त्यांच्या पाठीमागच्या बाकावर रामदास आठवले बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्यचकीत हावभाव होते. शशी थरूर यांनी त्यांचा हा फोटो ट्विटरवर टाकून आठवलेही अर्थसंकल्पावर चकित झाले आहेत. अर्थमंत्र्यांच्या दाव्यांवर ट्रेझरी बेंचचासुद्धा विश्वास नाही, असा दावा केला होता. त्यावरून रामदास आठवले यांनी शशी थरुर यांना इंग्रजीचे डोस पाजून झालेल्या चूका दाखवत चिमटे काढले. उगीचच बोलताना काही वेळा अशा चूका होतात, अशी कोपरखळी लगावली. शशी थरूर यांच्या ट्विटमध्ये बजेट आणि रिप्लाय या शब्दांची चुकीची स्पेलिंग होती. ती आठवले यांनी दाखवली. त्यावरून सभागृहातही हशा पिकला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami