संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

राम मंदिर आंदोलनातील आचार्य धर्मेंद्र यांचे निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जयपूर – अयोध्येतील राम मंदिर आंदोलनातील जहाल वक्ते राहिलेले श्री पंचखंड पीठाधीश्वर आचार्य स्वामी धर्मेंद्र महाराज यांचे सोमवारी निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.आचार्य दीर्घकाळापासून आजारी होते.गेल्या महिन्यात त्यांना २८ ऑगस्टपासून एसएमएस रुग्णालयात दाखल केले होते.
आचार्यांचे संपूर्ण आयुष्य सनातन संस्कृती आणि बंधुभाव भावनेशी समर्पित राहिले. त्यांचे श्रीराम जन्मभूमी आणि गोरक्षा आंदोलनामध्ये महत्त्वाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला. येथील पावन धाम मठात त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार होतील.बाबरी विध्वंस प्रकरणात निकाल येण्याच्या आधी त्यांनी आपण आरोपी क्रमांक एक असल्याचे म्हटले होते. शिक्षेला भ्यायचे का? जे केले ते सर्वांसमोर केले,असे ते म्हणाले होते

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami