नवी दिल्ली – राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी संसद भवनात अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश, समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव, द्रमुकचे ए. राजा आणि एनसी नेते फारुख अब्दुल्ला यांच्यासह अनेक प्रमुख विरोधी पक्षनेते उपस्थित होते. 2 दिवसांपूर्वी भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांनी अर्ज दाखल करण्याआधी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी यशवंत सिन्हा यांना पाठिंबा जाहीर केला आहे.