राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडाला भेट देणार

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद ७ डिसेंबर रोजी रायगडाला भेट देणार आहेत. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ही माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद संभाजीराजेंच्या निमंत्रणाला प्रतिसाद देत रायगडाला भेट देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

खासदार संभाजीराजेंनी देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना महाराष्ट्राचे वैभव असलेल्या आणि स्वराज्याचा साक्षीदार असलेल्या रायगडाच्या भेटीसाठी येण्याचे निमंत्रण दिले होते. संभाजीराजेंच्या निमंत्रणाला प्रतिसाद देत राष्ट्रपती कार्यालयाकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगड भेटीला येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, राष्ट्रपती ७ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देणार आहेत. राष्ट्रपतींची रायगड भेट ही गौरवास्पद बाब असल्याचे खासदार संभाजीराजेंनी नमूद केले आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासंबंधीचे प्रश्न मांडण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी शिवेसना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपाच्या खासदारांसह २ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी आरक्षणासंदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. याच भेटीदरम्यान संभाजीराजेंनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते.

Close Bitnami banner
Bitnami