संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

राष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरेेंच्या कारखान्याची मालमत्ता ईडीकडून जप्त

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या सहकार क्षेत्रातील, राजकारण क्षेत्रातील, विशेषतः सरकारच्या पातळीवरील जी मोठी नावे आहेत त्यांच्यावर ईडीकडून वारंवार धाडसत्र सुरु आहे. याचदरम्यान आता राज्याचे उर्जा राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या राम गणेश गडकरी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या या मालमत्तेची किंमत 13 कोटी 41 लाख रुपये इतकी असल्याचे समजते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने राम गणेश गडकरी साखर कारखान्याची नागपूरमधील 90 एकर जमीन काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्या तक्षशिला सिक्युरिटीजने खरेदी केली होती. तीही मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. यामध्ये नागपूरमधील कारखान्याची 90 एकर जमीन आहे. तर अहमदनगरमधील 4 एकर जमीनही ईडीने जप्त केली आहे. शिवाय प्राजक्त तनपुरे यांच्या दोन जमिनी जप्त केल्या आहेत. त्या जागेची किंमत जवळपास 13 कोटी 41 लाख इतकी आहे. एकूण 13 कोटी 41 लाख रूपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami