संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्ष उषा निळे यांचा अपघाती मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जळगाव : जळगाव जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येत आहे. अशातच आज सकाळी झालेल्या अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे.
याबाबतचे वृत्त असे की, राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्ष उषा दगडू निळे या काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्ष उषा दगडू निळे यांचे जळगाव येथे आज बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अपघाती निधन झाले. त्यांची अंतयात्रा आज संध्याकाळी ४ वाजता यावल तालुक्यातील कोळवद येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघाली. त्या यावल तालुक्यातील आगाराचे निवृत्त कंडक्टर डी. एस. निळे यांच्या पत्नी व जिल्हा संघटक घनश्याम दगडू निळे यांच्या आई होत्या.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami