मुंबई – भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने उस्मानाबाद येथे ५५ व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे २० ते २४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे दोन्ही संघ राज्य संघटनेचे सचिव अॅड.गोविंद शर्मा यांनी जाहीर असून या संघामध्ये नाशिक,सोलापूर, ठाणे, उस्मानाबादच्या खेळाडूंचा समावेश आहे. या संघाचे सराव शिबिर उस्मानाबाद येथे खो-खो फेडरेशनचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार पासून सुरू होणार आहे.
हिंगोली येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेतून महाराष्ट्राच्या १५- १५ जणांच्या संघात निवड करण्यात आली. दोन्ही संघांचे कर्णधार शिबीर समारोपप्रसंगी जाहीर केले जातील. राज्य खो-खो असोसिएशनने चार सदस्यीय निवड समिती नेमली होती.यामध्ये नागनाथ गजमल, प्रशांत देवळेकर, संदेश आंब्रे, सुप्रिया गाढवे यांचा समावेश होता.स्पर्धेत निवडल्या गेलेल्या खेळाडूंचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य संघटनेचे अध्यक्ष संजीव नाईक निंबाळकर यांच्यासह पदाधिकार्यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.
यामधील महाराष्ट्राचे पुरुष संघ – अनिकेत पोटे, निहार दुबळे,अक्षय भांगरे, ॠषिकेश मुर्चावडे (सर्व मुंबई उपनगर), प्रतिक वाईकर, सुयश गरगटे, आदित्य गणपुले (सर्व पुणे), लक्ष्मण गवस, गजानन शेंगाळ (सर्व ठाणे), सुरज लांडे,अक्षय मासाळ (सर्व सांगली), रामजी कश्यप (सोलापूर), दिलीप खांडवी (नाशिक), सुरज शिंदे (हिंगोली), सनी नायकवडी (उस्मानाबाद). राखीव : ॠषभ वाघ (पुणे), अनिकेत चेंदवणकर (मुंबई उपनगर), वेदांत देसाई (मुंबई). प्रशिक्षक : शिरीन गोडबोले (पुणे), व्यवस्थापक : नरेंद्र रायलवार (हिंगोली), फिजीओ : डॉ. किरण वाघ (अहमदनगर) तर महाराष्ट्राचा महिला संघ – प्रियांका इंगळे, काजल भोर, स्नेहल जाधव, दिपाली राठोड (सर्व पुणे), रुपाली बडे, पूजा फरगडे, रेश्मा राठाडे (सर्व ठाणे), संपदा मोरे, अश्विनी शिंदे, गौरी शिंदे (सर्व उस्मानाबाद), अपेक्षा सुतार, श्रेया सनगरे, आरती कांबळे (सर्व रत्नागिरी), प्रतिक्षा बिराजदार (सांगली), प्रिती काळे (सोलापूर). राखीव – सोनाली पवार (नाशिक), किरण शिंदे (उस्मानाबाद), स्नेहल चव्हाण (सांगली). प्रशिक्षक : प्रविण बागल (उस्मानाबाद), व्यवस्थापिका : माधुरी कोळी (ठाणे), सहाय्यक प्रशिक्षक: प्राची वाईकर (पुणे) असे हे दोन्ही संघ आहेत.