संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

राष्ट्रीय दुखवट्यामुळे RBI ने चलन विषयक बैठक पुढे ढकलली

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनामुळे देशभर दुखवटा पाळण्यात येत असल्याने RBI ने चलन विषयक होणारी आजची बैठक एका दिवसासाठी पुढे ढकलली आहे. 7 फेब्रुवारीपासून ही बैठक होणार होती. मात्र आता ही तीन दिवसीय बैठक उद्यापासून म्हणजेच मंगळवार 8 फेब्रुवारीपासून होणार आहे. ही बैठक झाल्यानंतर चलनविषयक निर्णय 10 फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या गृहकर्ज, गाडी कर्जावरील हप्त्यावर परिणाम होणार आहे.

अर्थसंकल्पाच्या द्वी मासिक पतधोरणात RBI मुख्य धोरणामध्ये दर आहे तसेच ठेवण्याची शक्यता आहे. तर अर्थसंकल्पात दिलेले आश्वासन आणि कच्च्या तेलाच्या किंमतींमुळे महागाई वाढण्याची शक्यता पाहता रिव्हर्स रेपो दरात वाढ होऊ शकेल. मात्र, यावेळी रेपो दरात कोणताही बदल होणार नाही. पुढील वर्षी त्यात 0.50 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.’ असं तज्ज्ञांनी म्हंटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami