संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

राष्ट्रीय सहकार धोरण मसूदा समितीचे सुरेश प्रभू अध्यक्ष

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली : केंद्रीय सहकार धोरण मसूदा ठरविण्यासाठी केंद्रिय सहकार मंत्री अमित शाह यांनी 48 जणांची समिती जाहीर केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना नेमले आहे. त्यांच्याबरोबर महाराष्ट्रातील मोठी नावे देखील आहेत.मात्र या नावांच्या यादीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि सहकारक्षेत्रात वर्चस्व असणाऱ्या शरद पवार यांना वगळण्यात आले आहे.सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली समितीची पहिली बैठक 15 सप्टेंबर रोजी होणार आहे.

महाराष्ट्राच्या सहकारी बँकांपासून ते सहकारी कारखान्यापर्यत शरद पवारांचे वर्चस्व आहे.त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सहकार क्षेत्रामध्ये पवारांचे मार्गदर्शन घेत होते.त्यानंतर 2019 नंतर मोदींनी पहिल्यांदाच सहकार हे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करुन त्याची जबाबदारी अमित शाह यांच्याकडे दिली. अमित शाह यांनी जाहीर केलेल्या राष्ट्रीय सहकार धोरण मसुदा समितीमध्ये महाराष्ट्राचे वर्चस्व आहे. यात माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली 48 जणांच्या हाय प्रोफाईल समितीमध्ये महाराष्ट्राचे सहकार क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे.मात्र शरद पवार यांचा समावेश नाही. त्याचबरोबर एकाही महिलेला समितीत स्थान देण्यात आले नसून, या मुद्यांवरुन समितीच्या गठनावर टीका होत आहे.सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली समितीची पहिली बैठक 15 सप्टेंबर रोजी होईल त्यानंतर तीन महिन्याच्या आत केंद्रीय सहकार धोरणाचा मसुदा केंद्र सरकारला सोपवणे अपेक्षित आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami