नवी दिल्ली – नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि खासदार राहुल गांधी आज पुन्हा एकदा चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहोचले होते. त्यांची चौथ्यांदा ईडीच्या अधिकार्यांनी कसून चौकशी केली. या चौकशीविरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील जंतरमंतरवर सत्याग्रह आंदोलन करत ईडी आणि मोदीविरोधात जोरदार घोषणा दिल्या. या चौकशीदरम्यान, दिल्ली पोलिसांनी ईडी कार्यालयाच्या परिसरातील रस्ते बंद ठेवले होते.
राहूल गांधी आपल्या गाडीतून आज सकाळी 11.30 वाजता ईडी कार्यालयात आले. यापूर्वी ईडीने राहुल गांधींना तीनवेळा चौकशीसाठी बोलावले होते. त्यांच्या आई काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनीया गांधींंची तब्येत ठीक नसल्याने त्या रुग्णालयात आहेत. त्यामुळे राहूल हे तीन दिवस चौकशीसाठी ईडी कार्यालयात गेले नव्हते. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा एकदा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजेरी लावली. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या सचिव प्रियांका गांधी होत्या. दरम्यान, पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजय माकन म्हणाले की, गेल्या आठवड्यात तीन दिवस 30 तास राहूल गांधींची चौकशी झाली होती. भाजप राहूल गांधींची ईडीद्वारे चौकशी करुन काँग्रेसवर दबाव आणत आहेत. राहूल गांधी शेतकरी आणि गरिबांसाठी आपला आवाज बुल्लंद करत आहे. हा आवाज बंद करण्याचा प्रयत्न भाजप केला जात असल्याचा आरोप माकन यांनी केला.