केरळ – वायनाड येथील काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वायनाड कार्यालयात गुरुवारी तोडफोड करण्यात आली.भारतीय युवक काँग्रेसने एसएफआय कार्यकर्त्यांवर या तोडफोडीचा आरोप केला आहे. सध्या कार्यालयात झालेल्या तोडफोडीच्या घटनेनंतर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर सरकारने शुक्रवारी रात्री एडीजीपी दर्जाच्याअधिकाऱ्यांना उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच कल्पेट्टाच्या पोलीस उपनिरीक्षकाला तपास पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.
केरळच्या सीएमओकडून माहिती देताना असे सांगण्यात आले की, राहुल गांधी यांच्या वायनाड कार्यालयाकडे मोर्चा आणि त्यानंतर झालेल्या तोडफोडीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी एडीजीपी पोलीस मुख्यालयाला तपास पूर्ण करून आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान,कल्पेट्टाच्या पोलीस उपनिरीक्षकाला तपास पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे,अशी माहिती सीएमओकडून देण्यात आली आहे.सध्या राहुल गांधींच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनेही केली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचा निषेध मोर्चा आणि राहुल गांधींच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप केला आहे.