संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

राहुल गांधी पंतप्रधान होणार नाही! वज्रदंतीचे अ‍ॅम्बेसिडर नक्की होतील

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई:- राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्राची देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर राहुल गांधी यांचे वेगवेगळे फोटो व्हायरल होत आहेत. भारत जोडो’ यात्रे दरम्यान राहुल गांधींनी ऊस खाल्ला. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मात्र,भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी या फोटोचा आधार घेत, राहुल गांधींवर टीका केली आहे. “राहुल गांधी पंतप्रधान होणारही नाहीत, पण विको वज्रदांतीचे ब्रँड ॲम्बेसडर नक्की होतील” असे म्हणत जोरदार निशाणा साधला आहे.

काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या ट्विटला प्रत्युत्तर दिले. ते म्हणतात की, एकीकडे राहुल गांधी देशभर सामान्यांची गळाभेट घेत पायी फिरत आहेत. तर दुसरीकडे सामान्य माणसांना भेटणे तर सोडाच; पण आता पत्रकारांनासुद्धा पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमासाठी ‘कॅरेक्टर सर्टिफिकेट’ द्यावे लागणार! लोकनेता आणि अहंकारी नेता यांतील हा फरक आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या कर्नाटकात आहे. अजून १८ दिवस ही यात्रा कर्नाटकमध्ये सुरू राहणार आहे. नंतर सदर यात्रा आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तेथून महाराष्ट्रात प्रवेश करेल. महाराष्ट्रात प्रवेश करण्याआधी भाजप – काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami