संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

राहुल गांधी यांनी राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे
महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेस बैठकीत ठराव मंजूर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बई – राजस्थान, दिल्ली आणि छत्तीसगड पाठोपाठ आता महाराष्ट्र काँग्रेस कमिटीनेही राहुल गांधी यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा ठराव मंजूर केला आहे. आज पक्षातील नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा ठराव मांडण्यात आला होता. जो एकमताने मंजूर करण्यात आला. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उद्या 20 सप्टेंबरला अधिसूचना निघणार आहे. 24 ते 30 सप्टेंबर या काळात उमेदवारी अर्ज भरावयाचे आहेत. तर आठ दिवसांमध्ये हे अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर 17 ऑक्टोबरला पक्षाध्यक्ष पदासाठी मतदान होणार आहे. या बैठकीला प्रदेश निवडणूक अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. यावेळी बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षपदी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नियुक्ती करावी, असा ठराव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मांडला. त्याला प्रदेश कार्याध्यक्ष, माजी मंत्री, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे आणि नसीम खान यांनी अनुमोदन दिले. यानंतर हा ठराव सर्व प्रतिनिधींनी एकमताने मंजूर केला. तसेच आजच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कोषाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी यांच्या निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना देण्याचा ठराव नाना पटोले यांनी मांडला. तोही
मंजूर झाला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami