भोपाळ – काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहूल गांधींच्या भारत जोडा यात्रेचा मध्य प्रदेशमधील शेवटचा दिवस होता. यात्रेत राहूल गांधींसोबत प्रसिद्ध कबीर भजन गायक प्रल्हादसिंगटिपानिया सहभागी झाले. आज संध्याकाळी भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशातील हद्द ओलांडून राजस्थानात पोहोचली. या यात्रेची सुरुवात माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा प्रभाव असणाऱ्या झालावाड जिल्ह्यातून होईल.
आज सकाळी सहा वाजता आगर येथील अन्नपूर्णा ढाब्याजवळील परिसर स्थळापासून यात्रेला सुरुवात झाली. या यात्रेत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह काँग्रेस कार्यकर्ते आणि स्थानिक नेतेही मोठय़ा संख्येने सहभागी होत आहेत. प्रल्हादसिंग टिपानिया, जीतू पटवारी, अरुण यादव, विक्रांत भुरिया यात्रेत सहभागी झाले. त्यावेळी या यात्रेत प्रल्हादसिंग टिपानिया भजन म्हणत राहूल गांधींसोबत चालले. त्यानंतर राहूल गांधींनी सकाळी 10.00 मुलींच्या वसतिगृहाजवळ सोयतकला येथे सकाळचा ब्रेक घेतला. त्यानंतर दुपारी मुलींच्या वसतिगृहाजवळून यात्रा सुरु केली. संध्याकाळी 6.30 वाजता डोंगरगाव येथील पिपलेश्वर बालाजी मंदिर येथे संध्याकाळचा ब्रेक घेतला. त्यानंतर संध्याकाळी ही यात्रा मध्य प्रदेशातील हद्द ओलांडून राजस्थानात पोहोचली.