रिलायन्सने परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे २४४ कोटी रुपये थकवले

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

परभणी – परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा हप्ता गोळा करण्याची परवानगी शासनाने रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला दिलेली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांनी पिक विमा हप्ता कंपनीकडे जमा केला आहे. मात्र रिलायन्स इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेल्या खरीप हंगाम व गेल्यावर्षीचा रब्बी हंगाम आणि चालू वर्षाचा खरीप हंगाम अशा दोन्ही हंगामातील मिळून एकूण २४४ कोटी ३५ लाख रुपये विमा परतावा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने थकविला आहे.

याबाबत परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रिलायन्स इन्शुरन्स कंपनीने ताबडतोब शेतकऱ्यांना पिक विमा वाटप करण्यात यावा, असे लेखी आदेश दिले होते. मात्र कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याने कंपनीच्या प्रमोद पाटील व विजय मोरे या दोघा समन्वयकांवर परभणी येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरेतर रिलायन्स इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांना अद्याप विम्याचे वाटप केलेले नाही. या कंपनीकडे २०२०च्या खरीप हंगामात परभणी जिल्ह्यातील ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी ३ लाख ७६ हजार ८० हेक्‍टरवरील पिके विमा संरक्षित केली होती. त्यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकूण २७७ कोटी ६५ लाख रुपये विमा हप्ता कंपनीकडे जमा केला होता.वर्ष २०२०मध्ये एकूण १ लाख ६१ हजार ३९० शेतकऱ्यांना १०७ कोटी रुपये विमा परतावा मंजूर झाला. त्यापैकी ८८ हजार ९९७ शेतकऱ्यांच्या खात्यावर ५२ कोटी ८४ लाख रुपये जमा करण्यात आले. परंतु गेल्यावर्षीच्या खरीपातील अद्याप ७२ हजार ३९३ शेतकऱ्यांचा ५५ कोटी १० लाख रुपये परतावा थकीत आहे. तसेच गेल्यावर्षीच्या रब्बी हंगामात ५५ हजार ४७७ शेतकऱ्यांनी ३६ हजार ८६८ हेक्टरवरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले. १० कोटी ९६ लाख रुपये विमा हप्ता कंपनीकडे जमा केला. १२ हजार ३०० शेतकऱ्यांना मंजूर ६ कोटी ५ लाख रुपये विमा परतावा अजून दिलेला नाही. प्रलंबित परताव्याची रक्कम जमा करण्याबाबत वारंवार सूचना देऊनही विमा कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केले. विमा कंपनीकडून नेहमी मनुष्यबळ अपुरे असल्याचे कारण सांगत पंचनामे एक महिना उलटूनही पूर्ण करण्यात आलेले नाहीत.

Close Bitnami banner
Bitnami